Anil Kapoor यांच्या खोट्या कोविड रिपोर्टवरुन मुलगी Sonam Kapoor भडकली; ट्विटद्वारे व्यक्त केला संताप (View Tweet)
Sonam Kapoor and Anil Kapoor (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत होत्या. त्यानंतर अनिल कपूर ने स्वत: ट्विट करत सत्याचा उलघडा केला आहे. कोरोना रिपोर्ट निगेव्हीट आला असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या फेक असल्याचे अनिल कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यावर अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) चांगलीच भडकली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या देणे भयानक असल्याचे म्हटले आहे. तसंच जबाबदारीने पत्रकारिता करण्याचा सल्लाही तिने दिला आहे.

सोनम कपूर हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "चुकीच्या बातम्या देणे भयानक आहे. मी लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडीलांशी बोलण्यापूर्वीच काही मीडियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया पत्रकारीता जबाबदारीने करा." (Jug Jugg Jeeyo च्या सेटवर कोरोनाचा हैदोस! वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह)

पहा ट्विट्स:

तर अनिल कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सांगतो की, माझा कोविड-19 चा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद."

अनिल कपूर चंदीगढ मध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू सिंह सोबत 'जुग जुग जियो' चे शूटिंग करत होते. या चित्रीकरणादरम्यान, नीतू सिंह आणि निर्देशक राज मेहता यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आणि शूटिंग थांबवण्यात आले.