न्यूयॉर्कमधील उपचारानंतर कॅन्सरग्रस्त Sonali Bendre मायदेशी परतली (Photos)
सोनाली बेंद्रे (Photo Credits: Yogen Shah)

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये (New York) कॅन्सरवर उपचार घेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) मायदेशी परतली आहे. 3 डिसेंबर, सोमवारी मध्यरात्री ती पती गोल्डी बहल (Goldie Behl) सोबत मुंबई एअरपोर्टवर सोनालीला स्पॉट करण्यात आले. यावेळेस सोनालीने विग घातला नसून बाल्ड लूकमध्ये ती मिडिया कॅमेऱ्यांसमोर आली.

सोनाली मुंबईत परताच एअरपोर्टवर तिच्या स्वागतासाठी मीडिया सज्ज होती. सोनाली देखील हसत मीडिया कॅमेऱ्यांना सामोरी गेली. मेटास्टेटिक कॅन्सरने (Metastatic Cancer) ग्रस्त असलेली सोनाली गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती.

कॅन्सरवर उपचार घेत असताना सोनालीला अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक संघर्षातून जावे लागले. मात्र तरीही मुंबईत परताच ती हसत मीडियाला समोरी गेली. अमेरिकेत उपचार घेत असताना तिने वेळोवेळी आपले हेल्थ अपडेट्स सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवले. मायदेशी परत असल्याचे तिने इंस्टाग्रावर पोस्ट करुन सांगितले.

सोनाली परताच पती गोल्डी बहल याने सांगितले की, "सोनाली आता बरी आहे. ती चांगल्यासाठीच परत आली आहे. तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. सध्या तरी ट्रिटमेंट संपलेली आहे. पण आजार परतण्याची शक्यता असल्याने नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे."

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी तिथे जावून सोनालीची भेट घेतली होती. प्रियंका चोप्रा, नीतू सिंग, सुजैन खान, दिया मिर्जा या तिच्या खास मैत्रिणी सोनालीला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या होत्या.