अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ला काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं. High-Grade Cancer असणाऱ्या सोनालीच्या Metastised कॅन्सरवरील उपचारांसाठी ती गेले 5 महिने अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) शहरामध्ये राहत होती. देशापासून दूर असलेल्या सोनाली बेंद्रेने गेले काही महिने अमेरिकेतच उपचार घेतले. कॅन्सरच्या उपाचाराच्या टप्प्यातील साऱ्या गोष्टी तिने चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. माझी कॅन्सरशी झुंज अजून संपली नाही पण “happy interval” साठी भारतात परतीच्या मार्गावर असल्याचं सोनाली बेंद्रे ने पोस्टमध्ये लिहलं आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार मागील काही दिवसांपासून अमेरिकेत राहणाऱ्या सोनाली बेंद्रेने घरापासून दूर गेल्यावर घराची किंमत कळतेय अशा आशयाची एक पोस्ट लिहली आहे. माझा संघर्ष अजून संपला नाही पण काही काळासाठी मी पुन्हा माझ्या लोकांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये येतेय. अशी पोस्ट सोनालीने शेअर केली आहे. कॅन्सरची सामना करताना आपण प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्येही आनंद शोधायला हवा असे सोनालीचं मत आणि प्रत्येक दिवसाचं ध्येय होतं. कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा रिअॅलिटी शोच्या मुला मुलींना खास संदेश, पहा विडिओ
कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेत असलेल्या सोनालीने मागील काही दिवसात दिवाळी, गणेशोत्सव, तिच्या लग्नाचा वाढदिवस ही महत्त्वाची सेलिब्रेशन मिस केली होती. न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, सुझेन रोशन यांच्यासोबत मजामस्ती केल्याचे फोटोदेखील शेअर केले होते.