कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा रिअ‍ॅलिटी शोच्या मुला मुलींना खास संदेश, पहा विडिओ
Sonali Bendre | (Photo Credits- YouTube)

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने जेव्हा आपल्याला कॅन्सरने ग्रासले आहे असे जाहीर केले तेव्हा बॉलीवूड सोबत तिचे लाखो चाहते दुःखी झालेले. सगळ्यांनाच या  बातमीने धक्का बसला होता. इरफान खानला कॅन्सर झालेली बातमी ताजी असतानाच सोनालीला देखील कॅन्सरने पछाडले आहे. पण आपण हार न मानता ह्या आजाराला लढा देणार ह्या निश्चयाने सोनाली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. अधून मधून ती आपल्या चाहत्यांना तब्येतीची माहिती देत असतेच. नुकतेच तिने 'इंडियास बेस्ट ड्रॅमेबाज' ह्या रिऍलिटी शोच्या मुलांना आपला संदेश पाठवला आहे.

 

View this post on Instagram

 

#sonalibendre sends a heartfelt message to the kids of #indiasbestdramebaaz 👍@viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

अमेरिकेला जाण्याच्याधी सोनालीची या रिऍलिटी शोच्या परीक्षकासाठी निवड करण्यात आली होती. पण तिला शो सोडावा लागला. पण तिने शो मधल्या लहान मुलांना ग्रँड फिनालेला शुभेच्छा देण्यासाठी एक खास विडिओ अपलोड केला आहे. सोनाली असं म्हणते कि विवेक ओबेरॉय तिला ह्या मुलं मुलींचे व्हिडिओस पाठवतो ज्याला बघून तिला रडू येतं. तिने ह्या विडिओ मध्ये आपल्या जागी शो मध्ये आलेल्या हुमा कुरेशींचेही आभार मानले आहेत. तसेच आपण लवकर पूर्ण बरं होऊन भारतात परत येणार असल्याची भावना व्यक्त केली.

सोनाली बेंद्रेने हिंदी चित्रपट श्रुष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सरफरोश, हम साथ साथ है, मेजर साहब अशा बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये तिने बहारदार अभिनय केला आहे.