 
                                                                 बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) काही काळापासून कॅन्सर (cancer) आजाराशी झुंज देत होती. मात्र आता सोनालीला असलेला कॅन्सर बरा झाला असून ती न्यूयॉर्क (New York) मधून भारतात (India) आली आहे. नुकत्याच एका टीव्ही मुलाखतीत सोनाली हिने कॅन्सर सोबत कशा पद्धतीने मात केली याबाबतच्या अनुभवाबद्दल सांगितले. तसेच कॅन्सर असल्याचे कळल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडताना भीती वाटायची असे सोनाली म्हणाली. मात्र आता कॅन्सवर मात केल्यानंतर प्रथमच सोनालीने वोग (Vogue) या फॅशन मॅगझिनसाठी फोटो शूट केले आहे.
सोनाली हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शूट पोस्ट केले आहे. तसेच फोटोला खाली कॅप्शन देत असे लिहिले आहे की, ही आयडिया एकदम वेडसर होती. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही, डोक्यावर केस नाही. मात्र साधेपणा हेच माझे मूळ रुप असल्याचे सोनालीने म्हटले आहे. (हेही वाचा-न्यूयॉर्कमधील उपचारानंतर कॅन्सरग्रस्त Sonali Bendre मायदेशी परतली (Photos)
यासोबत वोग इंडिया मॅगझिनने इंन्स्टाग्रामवरुन सोनालीच्या फोटो शूटचे आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅन्सरवर उपचार घेत असताना सोनालीला अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक संघर्षातून जावे लागले. मात्र तरीही मुंबईत परताच ती हसत मीडियाला समोरी गेली होती. अमेरिकेत उपचार घेत असताना तिने वेळोवेळी आपले हेल्थ अपडेट्स सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवले होते.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
