सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून रसोडे मे कौन था चा ट्रेन्ड सुरु आहे. त्यामुळे लोक आपल्या परीने विविध अंदाजात त्याची मजा घेत आहेत. रविवारी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या मजेशीर गाण्याचा एक नवे वर्जन पोस्ट केले आहे. त्यात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्याचा उद्देशाने बनवला होता.(Rasode Me kon Tha Kokilaben Video: रसोडे मे कौन था व्हिडिओ वर ओरिजनल कोकिलाबेन म्हणजेच रुपल पटेल यांंनी दिली 'ही' रिएक्शन)
स्मृती इराणी यांनी व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओत स्मृती इराणी यांनी 2010 मधील लोकप्रिय टीव्ही शो साथ निभाना साथिया मधील कोकिलाबेन चा प्रसिद्ध संवाद रसोडे मै कौन था चे लिपसिंक करताना दिसून येत आहेत. याच पद्धतीने अन्य कलाकार सुद्धा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ही सहभागी केले आहे.(#JusticeForKaku: 1800 रुपये मागणार्या काकुंंना न्याय देण्यासाठी बनवलेलं गाणंं सुद्धा व्हायरल, तुम्ही ऐकलंत का Watch Video)
व्हिडिओच्या शेवटी भाजप प्रवक्ते संबित पात्रा राहुल हेच राशी असल्याचे बोलताना दिसून येत आहेत. एका टेलिव्हिजन वरील वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे. त्याच्याच एक भाग व्हिडिओत जोडून सादर केला आहे. आपल्या या पोस्टला कॅप्शन देत स्मृति इराणी यांनी आता फक्त हेच बाकी होते असे म्हटले आहे.