Sita-The Incarnation Poster (PC - Twitter)

Sita-The Incarnation: भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या पौराणिक विषयावर चित्रपट बनविण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. याच अनुक्रमे गुरुवारी 'सीता-द इनकारनेशन' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातून सीतेची न वाचलेली कहाणी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची घोषणा पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. तथापि, चित्रपट अद्याप प्री-प्रोडक्शन स्टेजच्या टप्प्यात आहे.

सीता- द इनकारनेशन चित्रपटाची पटकथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेली आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबली चित्रपटाची कथा लिहिली होती. याशिवाय अभिनेत्री कंगना रनौतच्या मणिकर्णिका चित्रपटाची पटकथादेखील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. या चित्रपटात सितेचे संवाद आणि गीत मनोज मुंतशीर हे लिहणार आहेत. मुंतशीर यांनी बाहुबली चित्रपटासाठी गीतं व संवाद लिहिला होता. (वाचा - Time To Dance Trailer: कैटरीना कैफची बहीण Isabelle Kaif चा डेब्यू चित्रपट 'टाइम टू डान्स'चा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ)

सीता- द इनकारनेशन हा एक भव्य आणि मेगा बजेट प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये व्हीएफएक्सचा वापर करण्यात येणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट जागतिक स्तरावरील प्रेक्षकांचा विचार करून बनवला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अलौकिक देसाई करत आहेत.

ट्विटरवर ही माहिती शेअर करताना मनोज मुंताशीर यांनी लिहिलं आहे की, कल्पनापेक्षा सुंदर आणि काळापेक्षा शक्तिशाली. भगवान श्रीरामाची चैतना, आई सीतेची अतूट कथा. मोठ्या पडद्यावर प्रथमचं. सीता- द इनकारनेशन. दिग्गज विजयेंद्र प्रसाद आणि अलौकिक देसाई या चित्रपटाची कथा लिहित आहेत. मी संवाद आणि गाणी लिहित आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अलौकिक देसाई करत आहेत.