Simmba Meta Review: रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!
Simmba (Photo Credit: Instagram)

Simmba Meta Review: मसालापट चित्रपट हिंदी रूपेरी पडद्यावर भव्य स्वरूपात निर्माण करणं ही ज्याची ओळख आहे त्या रोहित शेट्टीचा बहूप्रतिक्षित 'सिम्बा' (Simmba) अखेर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात बॉलिवूड कलाकारांसोबत  सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav),  नंदू माधव, वैदेही परशुरमी, नेहा महाजन सह  तब्बल 11 मराठी कलाकार झळकणार आहेत. अजय देवगण (Ajay Devgan) या सिनेमात कॅमिओच्या रूपात सिनेमामध्ये दिसणार आहे.पाहा सिनेमाचा ट्रेलर- व्हिडिओ

केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या सारा अली खानच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असलेल्याने सिम्बा सिनेमातील तिच्या कामाची उत्सुकता सर्वांना आहे. तर बॉलिवूडमध्ये एनर्जीची फॅक्टरी अशी ओळख असणारा रणवीर सिंग पहिल्यांदा अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमा करत असल्याने रोहित शेट्टी, रणवीर आणि सारा अली खान हे त्रिकुट कसं जमलयं हे पहा...

  • काय आहे सिम्बाचा रिव्ह्यू

लोकप्रिय ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सिम्बा चित्रटाचं कौतुक केलं आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाचं, रणवीरच्या तुफान एनर्जीचं त्यांनी कौतुक करताना हा सिनेमा वेल पॅकेज्ड एंटरटेनर सिनेमा असल्याचं म्हटलं आहे.

  •  पिंकव्हिलानेही सिम्बा सिनेमाचं कौतुक केलं आहे. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी हे समीकरण जुळून आल्याने हा सिनेमा पैसा वसूल असल्याचं पिंकव्हिलाचं मत आहे.
  • सिम्बा सिनेमातील रणवीरचा अभिनय, दमदार डायलॉग, स्लो मोशन आणि थिरकायला लावणारी गाणी ही सिम्बा सिनेमची जमेची बाजू आहे. हा सिनेमा 'massy' सिनेमाच्या चाहत्यांनी हा सिनेमा पहायलाच हवा. असा फिल्मफेअरचा रिव्ह्यू आहे.
  • टाईम्स ऑफ इंडियाच्या रिव्ह्युनुसारदेखील 'सिम्बा' हा सिनेमा पूर्ण पैसा वसूल आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने कमाल केली आहे. रोहित शेट्टीने अनेक पैसा वसूल क्षण प्रेक्षकांना दिले आहेत. अजय देवगणसह कलाकारांच्या अभिनयाचं , सिनेमातील स्त्री कलाकारांचंही कौतुक करण्यात आलं आहे.
  • khaleej Times ने देखील 'सिम्बा'चं कौतुक केलं आहे. हा सिनेमा फॅमिली एंटरटेनर असल्यचं म्हटलं आहे. रणवीरचा तुफानी अंदाज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
  • Scroll.in नेदेखील रणवीरच्या चित्रपटातील एनर्जीचं आणि विषयाला सादर करण्याच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. सिनेमात कॅमिओच्या रूपात सिंघम अजय देवगणची एन्ट्री योग्य वेळी होते असं म्हटलं आहे.

सिम्बा हा तेलगू सिनेमा Temper च्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सचा रिमेक आहे. एक भ्रष्टाचारी पोलिस ऑफिसरच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण नेमका कोणता? स्त्रियांचं समाजात असुरक्षित असणं या विषयावर भाष्य करणारा 'सिम्बा' सिनेमा 'पैसा वसुल' असल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. त्यामुळे अ‍ॅक्शन आणि मसालापट पाहणं ही ज्यांची आवड आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा परफेक्ट 'इयर एंडर' आहे.