शिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला,  25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला Photo Credit : Instagram

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)ने नुकतेच कुटुंबियांसह शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतले आहे. यावेळेस शिल्पाने साईबाबा मंदिरात सोन्याचा मुकुट दान केला आहे. शिल्पाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या मदतीने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शिल्पा शेट्टीसोबत मंदिरात तिची आई सुनंदा शेट्टी, बहिण शमिता शेट्टी, मुलगा विआन आणि पती राज कुंद्रा उपस्थित होता. या सार्‍यांनी दर्शन घेतल्यानंतर साईबाबांच्या मूर्तीला सोन्याचा मुकूट दान केला आहे.

शिल्पा शेट्टीने(Shilpa Shetty) दान केलेल्या सोन्याच्या मुकूटाची किंमत सुमारे 25.75 लाख रूपये आहे. इंस्टाग्रामवर मुकुट दान करताना शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने खास मेसेज लिहला आहे. " जितकं दिलंतं त्याबद्दल साईबाबा तुमचे आभार, तुम्ही मला विश्वास, धीर, संयम ठेवायला शिकवला. माझं आणि माझ्या परिवाराचं रक्षण केलंत. तुमच्या श्रद्धेमध्ये माझं डोकं सदैव झुकलेलं असेल."असा मेसेज शिल्पाने लिहला आहे.

शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीयांकडून दान केलेला मुकूट साईंना चढवण्यात आला.  यंदा साईसमाधीचं 100 वं वर्ष आहे. त्यानिमित्त या वर्षभरात शिर्डीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या शिल्पा शेट्टी सिनेमांपासून दूर असली तरीही रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून ती रसिकांच्या भेटीला येते. साईबाबांप्रमाणेच शिल्पा गणपती बाप्पाची भक्त आहे. दरवर्षी शिल्पा शेट्टीच्या घरी लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.