बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. मग ते आपल्या योगा, फिटनेस व्हिडिओ मधून असो वा टिकटॉक व्हिडिओमधून. आपल्या खाजगी आयुष्यातील प्रत्येक गोड आणि वाईट क्षण ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आज 15 एप्रिल च्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इतकच नव्हे तर तिने आपले एक सिक्रेट देखील आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. 15 नंबर हा तिचा लकी नंबर असल्याचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना तिची गोंडस मुलगी समिशा देखील तिच्या सोबत आहे. आपल्या मुलीला हातात घेऊन तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. Gudi Padwa 2020 Puran Poli Recipe: 'गुढी पाडवा' निमित्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने बनवली खास पुरण पोळी; तुम्हीही नक्की ट्राय करा, पहा व्हिडिओ
पाहा काय म्हणतेय शिल्पा शेट्टी:
शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिशा हिचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आणि आज 15 एप्रिल तिला 2 महिने पूर्ण झाले त्यासोबतच आजच तिचे टिकटॉकवर 15 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. त्यामुळे आपल्याला 15 नंबर हा खूप लकी असल्याचे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
'मी आज प्रचंड आनंदी असून हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे' असं शिल्पा शेट्टी ने या व्हिडिओ खाली म्हटले आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा टिकटॉकवर अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. तिचे पती राज कुंद्रा यांचे देखील टिकटॉकवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.