Tandav वेबसिरीजच्या वादावरुन शर्मिला टागोर चितेंत; मुलगा सैफ अली खान ला दिला 'हा' सल्ला
Sharmila Tagore and Saif Ali Khan (Photo Credits: PTI & FB)

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तांडव (Tandav) वेब सिरीजचा (Web Series) वाद दिवसेंदिवस वाढत आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या या वेबसिरीजपुढील वाढत्या वादांमुळे सैफ अली खान ची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) चिंतेत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुलगा सैफ अली खान (Saif Ali Khan) याला एक खास दिला आहे. (Tandav Controversy: तांडव सीरिजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हणत मागितली माफी)

SpotboyE च्या रिपोर्टनुसार, तांडव वरुन सुरु असलेल्या वादामुळे 76 वर्षीय शर्मिला टागोर यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच करीना कपूर लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तांडव वादामुळे कुटुंबाच्या चितेंत वाढ होऊ नये, असे शर्मिला यांना वाटत आहे. त्यामुळे पुढे कोणताही प्रोजेक्ट साईन करण्यापूर्वी स्क्रिप्ट नीट वाच. आणि कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी काळजी घे, असा सल्ला त्यांनी आपल्या मुलाला दिला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही स्क्रिप्टवर काम करण्यापूर्वी आईला वाचून दाखवणार असल्याचा सल्ला सैफ अली खान याने घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफ अली खान अत्यंत निडर अभिनेता असून कोणतेही प्रोजेक्ट पुढे घेऊन जाण्यास घाबरत नाही. पण यामुळे त्रास होऊ शकतो.

तांडव वेबसिरीजच्या एका एपिसोडमध्ये भगवान शिव आणि राम यांच्या संवादात अपशब्द वापरला गेला आहे. यावरुन सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात असून निर्माते आणि अभिनेते यांच्यावर देशातील काही भागांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या युपी पोलिस या प्रकरणाचा तापस करत असून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि तांडव निर्मात्यांनाही वेब सीरिजच्या निर्मात्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यानंतर निर्मात्यांनी आक्षेपार्ह दृश्यं हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली असून यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वेबसिरीजचे 9 एपिसोड्स आहेत.