Gauri Khan | (File Image)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची पत्नी गौरी खान Gauri Khan) सध्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)  अर्थातच ईडीच्या रडारवर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी (Tulsiani Group) ग्रुपच्या कथित घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. गौरी ही लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांकडून 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कंपनीची चौकशी सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गौरीला मंगळवारी (डिसेंबर 19) नोटीस प्राप्त झाले. लवकरच तिची चौकशीही केली जाऊ शकते. गौरी खानने अद्याप नोटीसवर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे पुढे आले नाही.

गौरी खान हिची व्यावसायिक आघाडी

गौरी खान हिने तिचा पती शाहरुख खान याच्यासोबत सन 2002 मध्ये चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंट स्थापन केली. तसेच, तिने सन 2010 मध्ये इंटिरिअर डिझाईनमध्येही काम सुरु केले. तिनेने 2014 मध्ये तिचे पहिले कॉन्सेप्ट स्टोअर, द डिझाईन सेलचे उद्घाटन केले. ज्यात गौरी आणि इतर भारतीय डिझायनर्सचे फर्निचर मुंबईच्या वरळी परिसरात होते. 2017 मध्ये, गौरी खान डिझाइन्स, तिचा डिझाईन स्टुडिओ, जुहू येथे लॉन्च झाला. (हेही वाचा, Shah Rukh Khan And Gauri Khan With Kids: सुंदर पोर्ट्रेटमध्ये शाहरुखसह कुटुंबाचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल घायाळ, पाहा फोटो)

कौटुंबीक पार्श्वभूमी

रॉबर्टो कॅव्हॅली आणि राल्फ लॉरेन यांसारख्या उद्योगातील दिग्गजांसह घरातील सामानासाठी तिच्या सहकार्यासाठी प्रसिद्ध, गौरी रेड चिलीज बॅनरखालील चित्रपटांसाठी निर्माती म्हणूनही काम करते. तिने ऑक्टोबर 1991 मध्ये शाहरुख खानशी लग्न केले. या जोडप्याला आर्यन (1997), सुहाना (2000), आणि अबराम (2013) अशी तीन मुले आहेत. (हेही वाचा, Gauri Khan अडचणीत; ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीने केलेल्या फसवणूक केल्याने तक्रार)

काय आहे ईडी?

अंमलबजावणी संचालनालय (ED) ही एक कायदा अंमलबजावणी एजन्सी आणि आर्थिक गुप्तचर संस्था आहे. जी भारतातील आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करते आणि आर्थिक गुन्हेगारीशी लढते. ED ची स्थापना 1 मे 1956 रोजी करण्यात आली आणि ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचा एक भाग आहे. ED च्या जबाबदाऱ्यांमध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन उल्लंघनासारख्या आर्थिक गुन्ह्यांशी लढा देणे समाविष्ट आहे.

ईडी ही भारतातील एक प्रमुख आर्थिक तपास यंत्रणा आहे. ती एक स्वायत्त संस्था म्हणून ओळखले जाते. मात्र, अलिकडील काही काळात तिच्यावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप झाले आहेत. तसेच, देशातील स्वायत्त संस्था या सरकारच्या पोपट म्हणून काम करत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. विशेष म्हणजे असा आशायाचे एक विधान सर्वोच्च न्यायालयानेही केले होते. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची ईडीने या आधी विविध प्रकरणांमध्ये चौकशी केली आहे.