Shah Rukh Khan And Gauri Khan With Kids: गौरी खानने मंगळवारी तिच्या चाहत्यांना एका सुपर-एक्सक्लुझिव्ह फॅम-जॅम फ्रेमने थक्क केले आणि तिच्या "माय लाइफ इन डिझाइन" या पुस्तका बद्दल माहिती दिली. " #MyLifeInDesign, आता स्टोअरमध्ये उपलब्ध आहे," असे गौरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. परंतु पोस्ट केलेल्या फोटो चाहत्यांना वेड लावले आहे. फोटोमध्ये शाहरुख खान-गौरी खान आणि त्यांची मुले आर्यन, सुहाना, अबराम या परफेक्ट फॅमिली पोर्ट्रेटमध्ये ग्लॅमर वाढवतांना दिसत आहे. फ्रेममध्ये शाहरुख खान, आर्यन खान आणि अब्राम हे सर्व काळ्या लेदर जॅकेटमध्ये दिसत आहेत. गौरी आणि सुहानाने पांढरे टॉप आणि काळ्या लेदर पँटसह त्यांचे ग्लॅमर मीटर वाढवतांना दिसत आहे. मन्नतच्या भव्य ड्रॉईंग रूममध्ये त्या सर्वांनी पोझ दिली. शाहरुख खान आणि गौरी खान मुलांसह मनीष मल्होत्रा, झोया अख्तर, सीमा सजदेह, भावना पांडे, अनैता श्रॉफ अदजानिया यांनी गौरीच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, "जगातील क्रमांक 1 सुंदर कुटुंब." दुसऱ्याने लिहिले, "आमचे पठाण कुटुंब." शाहरुख खानच्या फॅन पेजने काही न पाहिलेले फोटोही शेअर केले आहेत. एका फ्रेममध्ये सुहाना खान आणि शाहरुख एकमेकांसमोर बसून पोज देत होते.
पाहा फोटो:
View this post on Instagram
दुसर्या फ्रेममध्ये कुटुंबाने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. कुटुंबातील पुरुषांनी निळ्या डेनिम जॅकेटसह पांढरा शर्ट घातला होता. सुहाना आणि आर्यन अब्रामकडे बघत होते, तर अब्रामने सुंदर स्माईलने लाइमलाइट चोरला. शाहरुख खानने पत्नी गौरीला दिलेले पहिले व्हॅलेंटाईन डे गिफ्ट गुलाबी प्लास्टिकच्या कानातले होते. वृत्तानुसार, शाहरुख पहिल्यांदा गौरीला 1984 मध्ये भेटला होता, जेव्हा तो 18 वर्षांचा होता.
गौरी त्यावेळी अवघ्या १४ वर्षांची होती. एका पार्टीत जेव्हा ती तिच्या मैत्रिणीसोबत नाचत होती तेव्हा ते भेटले. गौरीने त्याच्याशी 'तीन सेकंदांपेक्षा जास्त' बोलल्यानंतर त्याला 'चांगले' वाटले आणि गौरीला डेट करण्याची इच्छा झाली. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर, दोघांनी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षानंतर, गौरी आणि शाहरुखने त्यांच्या पहिल्या मुलाचे, आर्यन खानचे स्वागत केले. शाहरुख आणि गौरीची मुलगी सुहाना खानचा जन्म 2000 मध्ये झाला होता, तर त्यांचा सर्वात धाकटा मुलगा अबराम खानचा जन्म 2013 मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.
इंटिरिअर डिझाइनच्या व्यतिरिक्त, गौरीने नेटफ्लिक्सच्या मूळ मालिकेच्या फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजच्या दोन सीझनमध्ये देखील विशेष भूमिका साकारली.