Gauri Khan | Facebook

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील लखनौ (Lucknow) मध्ये अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) ची पत्नी गौरी खान (Gauri Khan) विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. IPC कलम 409 अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. मुंबईचे रहिवासी Jaswant Shah यांच्याकडून ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. गौरी खान ब्रांड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीकडून घराचा ताबा न मिळाल्याने गौरी विरोधातही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

लखनौ च्या गोल्फ सिटी भागामध्ये असलेल्या Tulsiyani Golf View मध्ये 86 लाख किंमतीच्या फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गौरी खान व्यतिरिक्त तक्रार Tulsiyani Construction and Development Limited चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अनिल कुमार तुलसियानी आणि डिरेक्टर महेश तुलसियानी यांच्या विरोधातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारदाराने आपण ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर गौरी खानच्या प्रभावाखाली येऊन फ्लॅट बूक केल्याचं म्हटलं आहे. पण या व्यवहारात फसवणूक झाल्याने त्यांनी तक्रार नोंदवली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, तक्रारदाराने फ्लॅट बूक करण्यासाठी दिलेल्या नंबर वर कॉळ केल्यानंतर त्यांची बोलणी अनिल कुमार तुलसियानी आणि महेश तुलसियानी यांच्यासोबत झाली. त्यांचा व्यवहार 86 लाखांचा होता. HDFC कडून लोन घेऊन त्यांनी 85.46 लाख रूपयांचा व्यवहार ऑगस्ट 2015 मध्ये केला. ऑक्टोबर 2016 पर्यंत घराचा ताबा मिळणार होता.

कंपनीने दावा केला होता की 6 महिन्यात घराचा ताबा नाही दिला तर पैसे व्याजासहित परत केले जातील. पण तक्रारदाराने बूक केलेला फ्लॅट कोणत्यातरी दुसर्‍याच व्यक्तीला देण्यात आला. त्यामुळे रजिस्टर अ‍ॅग्रिमेंटपासूनच फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आता 25 फेब्रुवारीला सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात अनिल कुमार तुलसीयानी, महेश तुलसीयानी सह गौरी खान विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.