Shah Rukh Khan (Photo Credits: Instagram)

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रभाव आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या मनांत विषाणूमुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीचे विचार अनेकदा येत असतात. त्यात सातत्याने समोर येणाऱ्या नकारात्मक घटना यामुळे मन विषण्ण होते. यातून सामान्य काय पण सेलिब्रिटीही सुटलेले नाहीत. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने देखील कोविड 19 लॉकडाऊन विषयीचे विचार एका कवितेद्वारे व्यक्त केले आहे. गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ देशभरातील जवळपास सर्वच लोक होम क्वारंटाईन आहेत. या सर्वांसाठी ही कविता अगदी चपलखपणे बसणारी आहे. जीवनात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भाष्य करणारी ही कविता आहे. (अभिनेता शाहरुख खान याच्याकडून महाराष्ट्राला 25,000 PPE Kits; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार)

"लॉकडाऊन लेसन्स" अशा कॅप्शनसह शाहरुख खान याने ही कविता सोशल मिडियावर शेअर केली आहे. "लॉकडाऊन काळात घरात अडकलेले असताना आपल्याला अधिक लोकांची गरज भासत नाही. आपल्याला ज्यांच्याशी बोलावसं वाटतं ती लोकं आजूबाजूला असली तरी पुरेसं आहे. आपण घड्याळ्याचे फिरणारे चक्र काही वेळासाठी थांबवून स्वतःच्या आयुष्याचा नव्याने विचार करु शकतो. या सगळ्यात कोणीही काही म्हटलं तरीही प्रेम ही भावना कायमस्वरुपी टिकणारी आहे." अशा आशयाची ही कविता आहे.

शाहरुख खान पोस्ट:

 

View this post on Instagram

 

Lockdown lessons...

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

कोरोना व्हायरस संकटात शाहरुख खान याने मोठी आर्थिक मदत केली असून आपल्या ऑफिसमध्ये त्याने क्वारंटाईन सेंटर उभे केले आहे. अलिकडेच त्याने आरोग्य सेवकांसाठी PPE कीट्स आणि व्हेंटिलेटर्स पुरवण्यासाठी योगदान दिले. त्याचबरोबर मीर फाऊंडेशन या एनजीओला देखील मदत केली आहे. मीर फाऊंडेशन ही संस्था गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवते.