
Dil Toh Pagal Hai Re-Release: बॉलीवूडचे अनेक जुने चित्रपट पुन्हा रिलीज केल्या जात आहेत. सनम तेरी कसम हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. छावा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरही पुन्हा रिलीज करण्यात आलेल्या सनम तेरी कसमला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा सुपरहिट चित्रपट 'दिल तो पागल है' एकदा पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा आयकॉनिक रोमँटिक म्युझिकल चित्रपट 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा रिलीज होणार आहे, ज्यामुळे 90 च्या दशकातील सिनेमा प्रेमींसाठी हा कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नाही. यश चोप्रा द्वारा निर्देशित या चित्रपटाने 1997 मध्ये रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या हृदयात खास जागा बनवली आहे. या चित्रपटाची गाणी, कथा आणि स्टारकास्ट मुळे हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात संस्मरणीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. विशेषत: शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या अप्रतिम अभिनयाचे आजही कौतुक केले जाते.
येथे पाहा पोस्ट:
View this post on Instagram
जुने चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड पाहता 90 आणि 2000 च्या दशकातील चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये वाढत असलेली नॉस्टॅल्जियाची भावना लक्षात घेऊन 'दिल तो पागल है' पुन्हा चित्रपटगृहात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'दिल तो पागल है', 'आरे रे आरे', 'भोली सी सुरत' ही चित्रपटातील क्लासिक गाणी आजही संगीत रसिकांच्या आवडत्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.