Shah Rukh Khan ठरला जगात सर्वाधिक मागणी असलेला अभिनेता; Allu Arjun, Priyanka Chopra Jonas यांच्या नावाचाही समावेश (See List)
Shah Rukh Khan, Allu Arjun, Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टॅलेंट डिमांड (Talent Demand-Parrot Analytics) ने नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, शाहरुख खान हा जागतिक स्तरावर सर्वाधिक मागणी असलेला अभिनेता ठरला आहे. हा निकाल 20 जुलै ते 18 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या अभ्यासाचा परिणाम आहे. या निकालावरून दिसून येत आहे की, किंग खान हा युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील सर्वात प्रिय स्टार आहे. शाहरुखची स्टार पॉवर आणि पोहोच लक्षात घेता हे घडणारच होते. या यादीमध्ये शाहरुख अव्वलस्थानी असताना, दुसरा क्रमांक दक्षिणेचा स्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) मिळवला आहे.

या यादीमध्ये अनेक भारतीय कलाकारांचा समावेश आहे. शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन नंतर- प्रियंका चोप्रा, संग हूं, धनुष, दुलकर सलमान, सलमान खान, महेश बाबू, टॉम हिडलस्टन आणि कियारा अडवाणी यांचा समावेश आहे. या यादीमधील पहिल्या दहामध्ये फक्त प्रियांका चोप्रा जोनास आणि कियारा अडवाणी या महिला स्टार्सचा समावेश आहे.

डिस्ने प्लसवर 9 जून रोजी 'लोकी' रिलीज झाल्यापासून टॉम हिडलस्टनची लोकप्रियता आणखी वाढली आहे. लोकी ही एक अमेरिकन दूरदर्शन मालिका आहे जी मायकल वाल्ड्रॉनने तयार केली आहे व ती मार्वल कॉमिक्सवर आधारित आहे. (हेही वाचा: Amitabh Bachchan यांच्या नावाने नोंदणी केलेल्या Rolls Royceसह 7 लक्झरी कार बंगलोरमध्ये जप्त)

गेल्या तीन वर्षांपासून शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी त्याचे नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या शाहरुख दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत ‘पठाण’वर काम करत आहे. ऑक्टोबरमध्ये, तो दक्षिण स्टार नयनतारासोबत एक अॅक्शन थ्रिलर सुरू करण्याची अफवा आहे. शाहरुख राजकुमार हिरानीच्या पुढच्या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अल्लू अर्जुन सध्या पुष्पाच्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे, जो दोन भागांमध्ये रिलीज होईल.