Amitabh Bachchan यांच्या नावाने नोंदणी केलेल्या Rolls Royceसह 7 लक्झरी कार बंगलोरमध्ये जप्त
Amitabh-Bachchan (Photo Credits: Facebook)

कर्नाटक परिवहन विभागाने (Karnataka Transport Department) रविवारी रात्री बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाने नोंदणी केलेल्या रोल्स रॉयससह सात लक्झरी कार (Luxury car) जप्त केल्या आहेत. मात्र नंतर कळले की अमिताभ बच्चन यांच्याकडून लक्झरी कार विकत घेणाऱ्या बंगलोरच्या (Bangalore) व्यक्तीने त्यांच्या नावावर वाहनाची नोंदणी केली नाही. अधिकाऱ्यांनी उपस्थित मालक बाबूला आवश्यक कागदपत्रे तयार करून वाहन सोडण्यास सांगितले आहे. खरं तर कर न भरणे, योग्य कागदपत्रांचा अभाव आणि विमा यासाठी परिवहन विभागाने बंगळुरूच्या पॉश यूबी सिटी (Posh UB City) क्षेत्राजवळ एक मोहीम सुरू केली होती. कारचे सध्याचे मालक आणि उमराह डेव्हलपर्सचे मालक बाबू म्हणाले, मी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना 6 कोटी रुपये देऊन ही रोल्स रॉयस थेट खरेदी केली आहे. मी जुने वाहन विकत घेतले होते, जे अभिनेत्याच्या नावे होते. मी नोंदणीसाठी नाव बदलण्यासाठी अर्ज केला आहे. पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही.

आमच्याकडे दोन रोल्स रॉयस कार आहेत. दुसरी नवीन आहे. माझी मुले अमिताभ बच्चन यांची कार रविवार आणि सुट्ट्यांमध्ये घेतात. माझी मुलगी कारमध्ये प्रवास करत होती जेंव्हा ती जप्त करण्यात आली. त्याला आरटीओ कार्यालयात येण्यास सांगितले गेले आहे. शहराच्या बाहेरील नेलामंगला येथे, त्यांना घरी सोडण्याची विनंती केली. असे त्यांनी सांगितले आहे. कारचा सध्याचा मालक पुढे म्हणाला, मी परिवहन आयुक्तांशी बोललो आहे. तसेच त्यांना विनाकारण त्रास देऊ नये असे सांगितले. असे कारच्या सध्याच्या मालकाने सांगितले आहे.

त्यांनी स्पष्ट केले की शहरात एकाच नोंदणी क्रमांकासह अनेक गाड्या चालतात आणि ते त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आम्हाला वैध कागदपत्रे सादर केल्यानंतर कार सोडण्यास सांगितले आहे.  बच्चन यांनी आपली रोल्स रॉयस फँटम विकली होती जी त्याला चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी भेट म्हणून दिली होती. बच्चन यांनी 2019 मध्ये बेंगळुरूतील व्यापारी युसूफ शरीफ किंवा स्क्रॅप बाबू यांना 3.5 कोटी रुपयांचे फॅन्टम विकले. तो बंगलोरमध्ये उमरा डेव्हलपर्स नावाची रिअल इस्टेट कंपनी चालवतो. हेही वाचा Uttar Pradesh Shocker: 18 वर्षीय मतिमंद मुलीवर शहाजानपुर मध्ये बलात्कार, FIR दाखल

परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर म्हणाले की, योग्य कागदपत्रां अभावी रोल्स रॉयस कार जप्त करण्यात आली आहे. मालकाने अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असलेले पत्र सादर केले आहे. ज्यात असे म्हटले आहे की वाहन त्याला विकले जात आहे. योगायोगाने, जेव्हा कार जप्त केली गेली. तेव्हा ती चालकाकडून चालवली जात होती, ज्याचे नाव सलमान खान आहे.