फिट राहण्यासाठी सारा अली खानचा 'हा' आहे  फिटनेस फंडा (Video)
सारा अली खान (Photo Credits: Instagram)

सारा अली खान (Sara Ali Khan) डेब्यू करत असलेला सिनेमा केदारनाथ (Kedarnath)आजच प्रदर्शित झाला आहे. यात सारासोबत सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता फार वाढली होती. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र पहिल्या सिनेमात फिट आणि सुंदर दिसण्यासाठी साराने प्रचंड मेहनत घेतली आहे.

सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी साराने फिटनेससाठी प्रचंड घाम गाळला आहे.

पाहा साराचा फिटनेस फंडा....

यात सारा अनेक प्रकराचे कठीण व्यायामप्रकार करताना दिसत आहे. विविध व्यायामप्रकारांच्या कॉम्बिनेशन्सने साराने स्वतःला फिट ठेवले आहे.

'केदारनाथ' नंतर 28 डिसेंबरला साराचा 'सिम्बा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.