Kedarnath Trailer: सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या 'केदारनाथ' सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित (Video)
केदारनाथ सिनेमाचे पोस्टर (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या 'केदारनाथ' सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हा जबरदस्त ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढेल. या सिनेमातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. सिनेमाचा टीजरही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. पाहा : 'केदारनाथ'चा टीजर

सिनेमाचे पोस्टरही रविवारी रात्री प्रदर्शित झाले. हे पोस्टर शेअर करताना दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी लिहिले की, "प्रेमाचा अद्भूत प्रवास... भक्तीच्याही पलिकडचा..."

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक अभिषेक कपूरने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जावून दर्शन घेतले. तिथे त्यांनी भगवान शिवाकडे सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.

पाहा सिनेमाचा दमदार ट्रेलर...

रोनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.