Sanjay Dutt Health Update: संजय दत्त याच्यासोबत चाहत्याने काढलेला सेल्फी व्हायरल, अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण
संजय दत्त (Photo Credits: Instagram)

Sanjay Dutt Health Update:  बॉलिवूड मधील खलनायक म्हणजेच संजय दत्त याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना मी कामापासून ब्रेक घेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अशी बातमी समोर येत आहे की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. बाबा त्याची पत्नी मान्यता हिच्यासह उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला होता. याच वेळी संजय दत्त याच्यासोबत एका चाहत्याने काढलेला फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत बाबचा लूक अत्यंत बदललेला दिसून येत आहे. संजय दत्त याचा हे नवे रुप पाहून चाहत्यांनी त्याचा आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.(Sanjay Dutt: कॅन्सरग्रस्त संजय दत्त ने दुबईत जाऊन आपल्या मुलांची घेतली भेट, पत्नी मान्यता ने कुटूंबाचे फोटो शेअर करुन केली 'ही' भावनिक पोस्ट)

संजय दत्त या व्हायरल झालेल्या फोटो अत्यंत अशक्य वाटत आहे. हा फोटो हॉस्पिटल मधील एका कर्मचाऱ्यामधीलच असून बाबा सोबत क्लिक केलेला आहे. या व्हायरल फोटोत संजय दत्त याची तब्येत नाजुक असल्याचे दिसून येत आहे. तसेच फोटोमध्ये बाबाचा लूक बदलला ही आहे. संजय दत्त याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे साकडे घालत आहेत.(Sanjay Dutt Admitted Kokilaben Hospital: कॅन्सरवरील उपचारांसाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात)

दरम्यान, संजय दत्त गेल्या महिन्यात आपली पत्नी मान्यता हिच्यासोबत दुबईत आपल्या मुलांसह वेळ घालवताना दिसून आला होता. मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर संजय दत्त 30 सप्टेंबरला मुंबईत परतला आहे. संजय दत्त याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरु आहे. तेथे त्याच्यावर तिसरी किमोथेरपी केली जाणार आहे.