Sanjay Dutt: कॅन्सरग्रस्त संजय दत्त ने दुबईत जाऊन आपल्या मुलांची घेतली भेट, पत्नी मान्यता ने कुटूंबाचे फोटो शेअर करुन केली 'ही' भावनिक पोस्ट
Maanayata Dutt & Her Family (Photo Credits: Instagram)

Sanjay Dutt meets his Children in Dubai: बॉलिवूडमधला सर्वांचा लाडका संजू बाबा म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) याला कॅन्सर झाल्याची खबर ऐकताच त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संजयला फुफ्फुसांचा कर्करोग झाला असून काही दिवसांपूर्वी तो आणि त्याची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) मुंबई विमानतळावर दिसले होते. त्यानंतर सूत्रांकडून माहिती मिळाली की ते आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेले आहेत. काही दिवसांनंतर संजयला आपल्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी देश सोडून परदेशात जावे लागेल. त्यामुळे त्याआधी त्याने आपल्या मुलांना भेटणे उचित समजले. त्यांची भेट झाल्यानंतर मान्यता ने आपल्या या गोड कुटूंबाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये संजय दत्त, मान्यता, मुलगा शहरान दत्त (Shahraan Dutt)आणि मुलगी इकरा दत्त (Iqra Dutt)दिसत आहे. या फोटोखाली मान्यता दत्त हिने छान भावनिक असे कॅप्शन दिले आहे.

हेदेखील वाचा- Sanjay Dutt Admitted Kokilaben Hospital: कॅन्सरवरील उपचारांसाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मान्यता म्हणते 'आज मी देवाला भेट म्हणून असे सुंदर कुटूंब दिले याबद्दल त्याचे आभार मानते. काही तक्रार नाही. काही मागणे नाही. फक्त केवळ एकत्र राहो आम्ही असेच. आमीन' असे लिहिले आहे.

8 ऑगस्टला संजय दत्त ला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे समोर आले.

संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे. लवकरच तो आपल्या मुलांसोबत दुबईत थोडा वेळ घालवून पुन्हा मुंबईत परतेल.