Manyata Dutt Statement on Sanjay Dutt Lung Cancer: संजय दत्त च्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी पत्नी मान्यता चे स्पष्टीकरण; म्हणाली ते जिंकूनच परत येतील
संजय दत्त आणि मान्यता दत्त (Photo Credits- Instagram)

बॉलिवूडमधील सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या संजू बाबा म्हणजेच संजय दत्तला (Sanjay Dutt) फुफ्फुसाचे कर्करोग (Lungs Cancer) झाल्याची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडला हे सत्य पचवणे जरा अवघडच जातय. असं सागंण्यात येत आहे की, या आजारामुळे संजय दत्त थोडा वेळ ब्रेक घेऊन अधिक उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. यामुळे द्विधा मन:स्थितीत अडकलेल्या त्याच्या चाहत्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्याची पत्यनी मान्यता दत्त (Manyata Dutt) हिने संजय दत्तविषयी माहिती दिली आहे.

मान्यता असे म्हटले आहे की, "संजू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणा-या त्या सर्व लोकांचे मी आभार मानते. या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला ताकत आणि प्रार्थनेची जरूरत आहे. मागील काही वर्ष आमचे परिवार अनेक कठिण परिस्थितीतून गेला आहे. मात्र मला विश्वास आहे की, ही वेळ सुद्धा निघून जाईल. त्यामुळे मी संजूच्या सर्व चाहत्यांना विनंत करते की, त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका. उलट आम्हाला साथ द्या आणि आमचे मनोबल वाढवा." Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

संजू नेहमीच एक योद्धा राहिला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तो लवकरच यावर देखील मात करुन परतेल असही मान्यताने म्हटलं आहे.

संजय दत्त तब्येतीविषयी माहिती मिळाल्यानंतर अनुपम खेर, युवराज सिहं आणि अनेक दिग्गजांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून संजय दत्तलवकर बरा व्हावा अशा शुभेच्छा देणारे संदेश पोस्ट केले.