बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) असल्याचे निदान झाले आहे, असे चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यांनी मंगळवारी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. संजय दत्त याला शनिवारी सायंकाळी (8 ऑगस्ट) दिवशी श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून लीलवतीमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातील नॉन कोव्हिड वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.

संजय दत्तने काही वेळापूर्वी कामातून ब्रेक घेत असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. तसेच माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका, अशा अशायाचे ट्विट त्यांनी केले होते. यातच संजय दत्त यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्याची प्रकृती वेगाने सुधरावी, यासाठी आपण प्राथना करुयात, असे चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Rahat Indori Dies of Covid-19: प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांचा कोरोनामुळे मृत्यू

कोमल नाहाटा यांचे ट्वीट-

संजय दत्त लवकरच सडक 2 मध्ये झळकणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूत असून या सिनेमाचा डिजिटल प्रिमियर होणार आहे. मात्र, संजत दत्त हे उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.