Rahat Indori (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग देशभरात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपीपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच प्रसिद्ध गझलकार आणि शायर राहत इंदौरी (Rahat Indori) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

राहत इंदौरी हे 70 वर्षाचे असून त्यांच्यात कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यात त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर उपचारासाठी त्यांना मध्य प्रध्यप्रदेशातील अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे. हे देखील वाचा- Web Series On Gangster Vikas Dubey: प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता करणार गँगस्टर विकास दुबे च्या जीवनावर आधारित वेब सीरिजचं दिग्दर्शन

एएनआयचे ट्वीट-

राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर आहेतच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत. आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.