Sanjay Dutt (Photo Credits: Facebook/ Film Fare)

Sanjay Dutt Admitted Kokilaben Hospital: कॅन्सरवरील उपचारासाठी अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले आहे. संजय दत्तला कॅन्सरवरील उपचारासांठी अमेरिकेला जायचे होते. मात्र, मुंबई ब्लास्ट प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तो सिंगापूरमध्ये जाऊन उपचार करु शकते. सध्या संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे.

दरम्यान, मंगळवारी संजय दत्त त्याच्या बिल्डिंगच्या खाली दिसून आला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता दत्त, दोनही बहिणी होत्या. सध्या संजय दत्तचा कॅन्सर चौथ्या स्टेजमध्ये आहे. (हेही वाचा -Sushant Singh Rajput Death Probe: रिया चक्रवर्ती मुंबई पोलिस, ED प्रमाणेच CBI चौकशीला देखील सामोरी जाईल: वकील सतिश मानशिंदे)

 

View this post on Instagram

 

🙏🏻

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

मागील आठवड्यात संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याला श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. यावेळी त्याची रॅपिड कोरोना टेस्टही करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. संजय दत्त कॅन्सर आजारातून लवकर बरा व्हावा, यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.