Salman Khan (Photo Credits: Instagram)

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसवर चर्चा होत आहे. प्रत्येकाच्या डोक्यात कुठे ना कुठे तरी तोच विचार असतो. सामान्यांसह सेलिब्रिटी देखील यातून सुटलेले नाहीत. मात्र लॉकडाऊनमुळे घरी असलेल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सेलिब्रिटी नवेनवे फंडे वापरत आहेत. तर कधी सुरक्षित राहण्याचे आवाहन विविध प्रकारे करत आहेत. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) याने देखील त्याच्या हटके स्टाईलमध्ये नागरिकांना जागरुक केले आहे. यासाठी त्याने 'मैनें प्यार किया' (Maine Pyaar Kiya) या सुपरिहट सिनेमातील रोमांटिक सीनचा व्हिडिओ रिक्रिएट केला असून तो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

'मैनें प्यार किया' सिनेमात एका दृश्यात सलमान भाग्यश्रीच्या लिपस्टिकचे निशाण असलेल्या काचेसमोर येतो आणि तिथे त्याला भाग्यश्रीने लिहिलेली एक चिठ्ठी दिसते. त्यात ती प्रेमाचे ते निशाण सलमानला पुसायला सांगते मात्र 'मैंने प्यार किया' मधील सलमान ते पुसत नाही. आता 30 वर्षांनंतर सलमान खान याने हा सीन रिक्रिएट करत त्याला ट्विस्ट दिला आहे. या ट्विस्टला कोरोनाची पार्श्वभूमी आहे. काय आहे तो ट्विस्ट तुम्हीच पहा. हा व्हिडिओ शेअर करताना सलमान खानने लिहिले की, "जर मैंने प्यार किया आता प्रदर्शित झाला असता... "

सलमान खान पोस्टः

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

व्हिडिओत सलमान खान चक्क सॅनिटायझरने लिपिस्टिकचे निशाण पुसताना दिसत आहे. म्हणेजच कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सलमानने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. Coronavirus Lockdown मध्ये सलमान खान घोड्यांसोबत एन्जॉय करतोय ब्रेकफास्ट; पहा त्याचा अजब अंदाज (Watch Video)

काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह सलमान खान पनवेल मधील आपल्या हार्महाऊसवर गेला होता. मात्र त्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला मुंंबईत परतू शकला नाही. त्यामुळे सध्या सलमान आपल्या चाहत्यांसोबत हार्महाऊसवरील गंमती जमती शेअर करत आहे.