जेव्हा सलमान खान रेस मध्ये घोड्याला हरवतो! (Watch Video)
Salman Khan's race with horse (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान (Salman Khan) याच्या फिटनेसची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. वाढते वय त्याच्या फिटनेसच्या आड कधीच आले नाही. सोशल मीडियावरील त्याचे खास व्हिडिओज सल्लूच्या फिटनेसचा प्रत्यय देतात. आता सध्या सलमानच्या एका व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा आहे. या व्हिडिओत सलमान खान याने चक्क घोड्याशी रेस लावली असून विशेष म्हणजे ही रेस तो जिंकतो. यावरुन आपल्याला त्याच्या फिटनेसचा अंदाज आला असेल.

अलिकडेच सलमान खान याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 53 वर्षांच्या सल्लूचा फिटनेस वाखाण्यासारखा आहे.

पहा व्हिडिओ:

 

यापूर्वी सलमान खान याने योगदिनी स्विमिंग पूल मधील बॅक फ्लिप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याची देखील सोशल मीडियात भलतीच चर्चा रंगली होती.

सध्या सलमान 'दबंग 3' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच तो 'इंशाअल्लाह' (Inshallah) या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.