Salman Khan (Photo Credits: Twitter)

सलमान खान (Salman Khan) याने यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 (International Yoga Day 2019) विशिष्ट स्टाईलने सेलिब्रेट केला आहे. याचा एक खास व्हिडिओ सलमान खान याने  सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सलमान खान स्विमिंग पूलमध्ये ड्राईव्ह करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ शेअर होताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सलमान खान याने ब्लू रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट घातले असून काही उंचीवरुन बॅक फ्लिप (Back Flip) करत स्विमिंग पूल मध्ये ड्राईव्ह मारताना व्हिडिओत दिसत आहे. (सलमान खान चे अनोख्या अंदाजातील हे वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

सलमान खान ट्विट:

 

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सलमान खान याच्या 'भारत' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली. तर आता सध्या सलमान 'दबंग 3' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो संजय लीला भन्साळी यांच्या 'इंशाअल्लाह' (Inshallah) देखील झळकेल.