सलमान खान चे अनोख्या अंदाजातील हे वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Salman Khan Workout (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन आग्रही असतो. किंबहुना त्याने बॉलिवूडमध्ये अनेक ज्युनिअर कलाकारांना आपले फिटनेस फंडेही देतो. सलमान आपल्या वर्कआऊटसाठी विशेष मेहनत घेतो. त्यासाठी तो आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून नियमितपणे वर्कआऊट करतो. मात्र आता केलेले हे अनोखे वर्कआऊट पाहून तुमचे डोके गरगरल्या शिवाय राहणार नाही.

नुकताच त्याने हा व्हिडिओ शेअर केला. यात तो चक्क त्याच्या बॉडीगार्ड्सना पायावर घेऊन उचलत वर्कआऊट करत आहे.

 

View this post on Instagram

 

After experiencing the highs and lows my security has finally realised how secure they are wid me .. ha ha

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

हा व्हिडिओ पाहून त्याचे असंख्य चाहते अचंबित झाले आहे. सलमान हा व्हिडिओ शेअर करत त्याने त्याखाली असे लिहिले आहे की," आयुष्यातले अनेक चढ-उतार पाहिल्यानतर माझी सुरक्षा करणा-या बॉडीगार्ड्सना हे कळून चुकले आहे की ते माझ्यासोबतच जास्त सुरक्षित आहेत. हाहाहा" तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की सलमानचे बॉडीगार्ड जिमच्या उपकरणावर बसले आहेत.

प्रदर्शनाच्या अवघ्या 4 थ्या दिवशी 'भारत' सिनेमाची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; पहा किती केली कमाई

सलमानच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'भारत' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात त्याच्यासोबत कैटरीना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जैकी श्रॉफ यांनी महत्त्वपुर्ण भूमिका बजावली आहे. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर 200 करोडची कमाई केली आहे.