प्रदर्शनाच्या अवघ्या 4 थ्या दिवशी 'भारत' सिनेमाची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; पहा किती केली कमाई
Bharat Movie (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा 'भारत' (Bharat) सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत सलमान खान आणि कैतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या भारत सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी भारत सिनेमाने 26.70 कोटी रुपयांचा गल्ला करत एकूण तब्बल 122.2 कोटींची कमाई केली आहे. (सलमान खान याच्या 'भारत' सिनेमाची सलग दुसऱ्या दिवशीही बंपर कमाई; पहा किती केला गल्ला)

तरण आदर्श ट्विट:

पहिल्या दिवशी तब्बल 42.30 कोटींची कमाई करत सिनेमाने चांगली सुरुवात केली. त्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांचे प्रेम सातत्याने मिळत राहीले. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 31 कोटी तर तिसऱ्या दिवशी 22.20 कोटींचा गल्ला केला. अली अब्बास जफर आणि सलमान खान यांच्या जोडीची जादू पुन्हा एकदा चालली. तर सलमान-कैतरिनाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

सलमान-कैतरिना शिवाय सिनेमात तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी आणि नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ या कलाकरांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी एकत्रितपणे सिनेमाची निर्मिती केली आहे.