दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर (Saie Manjrekar) लवकरच आपल्याला 'मेजर' (Major) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदिप उन्नीकृष्णन याच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. या लूकमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे. शाळेच्या गणवेशातील सईचा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड भावला. तिचा हा क्युट लूक पाहून सोशल मिडियाद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सई मांजरेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा मेजर चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात ती शाळेच्या गणवेशात अभिनेता अदिवि शेष याच्या शेजारी बसलेली दिसतेय. यात सई अदिवकडे अत्यंत प्रेमाने पाहत असल्याचं दिसून येतयं.हेदेखील वाचा- Jacqueline Fernandez ने आगामी चित्रपट ‘Ram Setu’ मधील आपला खास लूक केला शेअर; पहा फोटो
View this post on Instagram
सईच्या या लूक चाहत्यांची पसंती मिळाली असून तिचे चाहते सोशल मिडियाद्वारे तिचे भरभरून कौतुक करत आहेत. सलमान खानसोबत 'दबंग 3' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सई आता बॉलिवूडमध्ये आपला दुसरा चित्रपट घेऊन येत आहे.
‘मेजर’ सिनेमात मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि त्यांची प्रेयसी असलेल्या ईशाची प्रेम कहाणी देखील पाहायला मिळणार आहे. यात सईच्या लूकसोबतच ईशाने संदीप यांना लिहलेलं एक पत्र पाहायला मिळतंय. ईशाच्या हस्ताक्षरातील या पत्रावरच सई आणि अदिवि यांचा फोटो पाहायला मिळतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात सई 16 वर्षाच्या मुलीपासून 28 वर्षांच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. 'मेजर' सिनेमा हिंदीसोबतच तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या तेलगू व्हर्जनसाठी सईने तेलगू भाषेचे धडे घेतले. तेलगू सिनेमातील सईच्या संवादांसाठी कोणत्याची व्हाइश ओव्हर आर्टिस्टची मदत घेण्यात आलेली नाही. तेलगू भाषेतील सर्व डायलॉग सईने स्वत: म्हंटले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी सईचं कौतुकही केलं आहे.