Jacqueline Fernandez ने आगामी चित्रपट ‘Ram Setu’ मधील आपला खास लूक केला शेअर; पहा फोटो
Jacqueline Fernandez (PC - Instagram)

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अक्षय कुमार आणि नुसरत भरूचा यांनी त्यांच्या आगामी राम सेतु (Ram Setu) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपला रामसेतु चित्रपटातील लूकचा ब्लॅक इन व्हाइट फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो 5 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर फिल्मी जगातील अनेक स्टार भाष्य करून तिचे कौतुक करत आहेत. हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे की, "राम सेतु चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस. या चित्रपटाचा एक भाग असल्याने मला खूप आनंद होत आहे! हा फोटो काढल्याबद्दस अक्षय कुमारचे आभार."

नुकताच अभिनेता अक्षय कुमारनेदेखील या चित्रपटाचा पहिला लूक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अक्षय कुमारने म्हटलं होत की, 'राम सेतु, माझ्यासाठी सर्वात खास चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे शुटिंग आजपासून सुरू होत आहे. या चित्रपटात मी पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. या लूकवर तुमचे विचार ऐकायला मला आवडेल. हे माझ्यासाठी नेहमीचं महत्त्वाचं असतं.' (वाचा - Akshay Kumar Tested COVID-19 Positive: खिलाडी अक्षय कुमार कोरोना पॉजिटिव्ह, होम क्वारंटाईन असल्याचे सांगत सोशल मिडियाद्वारे दिली माहिती)

अक्षय कुमारने गेल्या वर्षी 'राम सेतु' चित्रपटाची पोस्ट शेअर करत ही घोषणा केली होती. पुढच्या वर्षी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटल जात आहे. 'तेरे बिन लादेन' आणि 'परमाणु' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कॅप ऑफ गॉड या चित्रपटाच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती 'राम सेतु' चित्रपटाशिवाय अर्जुन कपूर आणि सैफ अली खानच्या 'भूत पोलिस' चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तसेच, ती रोहित शेट्टी यांच्या ‘सर्कस’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.