Akshay kumar (Photo Credit - File Photo)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची लागण (COVID Positive) झाली आहे. स्वत: अक्षय कुमारने सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली असून आपण होम क्वारंटाईन असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे चाहतेही चिंतेत आहे. याआधी आमिर खान, आर माधवन, कार्तिक आर्यन, परेश रावल यांना कोरोनाची झाल्याची माहिती मिळाली होती. त्यात आता अक्षय कुमारचाही समावेश झाला आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले असून योग्य ती काळजी घेत असल्याचे त्याने सांगितले आहे.

"आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाईन केले असून सर्व नियमांचे पालन करत आहे. मागील काही दिवसांत माझ्या जे कुणी संपर्कात आले असतील त्यांनी कृपया स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी." अशी अक्षय कुमारने सोशल मिडियावर माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- Alia Bhatt Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

त्याचबरोबर मी लवकरच एक्शनमध्ये परत येईल असेही तो आपल्या चाहत्यांना म्हणाला. गेल्या महिन्याभरात अनेक बॉलिवूडकरांना कोरोनाने घेरले आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसह, रणबीर कपूर, मिलिंद सोमण, आलिया भट, बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक बप्पी लहरी सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आलिया भट होम क्वारंटाईन आहे.

त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही कोरोनाची लागण झाली आहे. होम क्वारंटाईन असलेल्या सचिन खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झाला आहे.