Alia Bhatt Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती
आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Alia Bhatt Tested COVID-19 Positive: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा मित्र रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. आलियाचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही काही आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक नामांकित व्यक्ती कोरोना विषाणूच्या शिकार झाल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आमिर खान, कार्तिक आर्यन, विक्रांत मासे, मनोज बाजपेयी, बप्पी लहरी, तारा सुतारिया यांच्यानंतर आलिया भट्टचे नाव कोरोना संक्रमित सेलिब्रिटींमध्ये जोडले गेले आहे.

आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. या पोस्टमध्ये आलियाने लिहिलं आहे की, 'हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग केलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मी कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे पालन करत आहे. तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या.' (वाचा - Bappi Lahiri Tested COVID-19 Positive: सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात घेत आहेत उपचार)

Alia Bhatt Instagram Story

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक नामांकित व्यक्ती कोरोना विषाणूच्या शिकार झाल्या आहेत. दरम्यान, आज बिग बॉस फेम मोनालिसाचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आलं आहे. तिचे पती विक्रांतसिंग राजपूत यांनी याची पुष्टी करत म्हटलं आहे की, "मोनालिसा कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण तिला कोणतीही लक्षणे नव्हती. ती एसिम्प्टोमॅटिक आणि होम क्वारेन्टाईन आहे."

यापूर्वी गुरुवारी बॉलिवूड गायक आणि संगीतकार बप्पी लहरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक चित्रपट कलाकार कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याचा चित्रपटांच्या शूटिंगवर परिणाम होत आहे.