![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/04/13-3-380x214.jpg)
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक बप्पी लहरी (Bappy Lahiri) यांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. मात्र त्यांचे वय पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बप्पी लहरी यांची मुलगी रीमा लहरी यांनी सांगितले की, बप्पीदांनी कोरोना संबंधित योग्य ती खबरदारी घेतली होती. मात्र तरीही त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते लवकर बरे होऊन घरी परत यावे अशी आम्ही सर्व प्रार्थना करत आहोत.
महिन्याभरात बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना तसेच अन्य मंडळींना कोरोनाची लागण झाली. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण, फातिमा सना शेख, कार्तिक आर्यन यांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये आता बप्पीदांचे नाव देखील जोडले गेले आहे.हेदेखील वाचा- Aamir Khan पाठोपाठ R Madhavan कोरोना झाल्यानंतर '3 इडियट्स'चा सहकलाकार शर्मन जोशी ने आर माधवनच्या मजेशीर पोस्टला दिली तितकीच भन्नाट प्रतिक्रिया
बप्पी लहरी याचे खरे नाव अलोकेश लहरी आहे. त्यांचा जन्म बंगालच्या जलपैगुडी येथे झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये 'जख्मी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू दिला. आय आम डिस्को डान्सर, बम्बई नगरिया यांसारखी अनेक हिट गाणी त्यांनी दिली आहेत. बप्पी लहरी लवकरात लवकर बरे होऊन कोरोनावर मात करुन घरी परतावे अशी प्रार्थना त्यांच्या कुटूंबियांसह त्यांचे चाहते करत आहे.
बॉलिवूडमध्ये झपाट्याने पसरत चाललेला कोरोना पाहता सर्व कलाकारांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंत संजय दत्त, सलमान खान आणि सैफ अली खान यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान 24 मार्च ला परफेक्शनिस्ट आमिर खान याला कोरोनाची लागण झाल्याचे बातमी समोर आली. या बातमीने त्याचे चाहते चिंतेत पडले. सध्या तो होम क्वारंटाइनमध्ये असून सर्व नियमांचे पालन करत आहे. त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.