Sai Pallavi (Photo Credit - Twitter)

साउथची अभिनेत्री (South Actress) साई पल्लवीने (Sai Pallavi) केलेलं वक्तव्य तिला महागात पडल आहे. काश्मीरी पडितांचं (Kashmiri Pandit) पलायन आणि गौरक्षण याबाबत साई पल्लवीने वादग्रस्त वक्तव्य केल आहे. या केलेल्या वक्तव्यचा जाहीर निषेध करत बंजरग दलाच्या नेत्यांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या साई पल्लवी तिच्या आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. ती विविध ठिकाणी या चित्रपटाच जोरदार प्रमोशन करताना दिसुन येत आहे. दरम्यान एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे. याच मुलाखतीत साई पल्लवीने 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बद्दलही मत व्यक्त केल आहे. साईने चित्रपटात दाखविलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आणि हत्यांची तुलना गाय तस्कर आणि मॉब लिंचिंगशी केली.

काय म्हणाली सई पल्लवी? 

साई पल्लवी म्हणाली, 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात त्यांनी काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते हे दाखवले. मात्र काही वेळापूर्वी गाडीतून गाय घेऊन जाणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण करून जय श्री रामचा नारा दिला होता. मग जर तुम्ही धार्मिक संघर्षाबद्दल बोलत असाल तर मला सांगा या दोन घटनांमध्ये फरक कुठे आहे? काश्मिरी पंडितांचे हत्याकांड तेव्हा झाले आणि आता ही घटना घडली आहे. मुद्दा असा आहे की आपण बरोबर असले पाहिजे. जर तुम्ही चांगली व्यक्ती नाही आहात तर तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहू शकत नाही. (हे देखील वाचा: Soorarai Pottru Hindi Remake: विक्रमनंतर सुर्या अक्षय कुमारच्या 'सूरराई पोत्रू'च्या हिंदी रिमेकमध्ये करणार कॅमिओ)

Tweet

सोशल मीडियावर होत आहे टीका

सई पल्लवीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून लिहिले की, 'तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे'. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, 'मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय स्टार्स कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत'. अशातच सई पल्लवीच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.