अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपट तामिळ रीमेक सूरराई (Soorarai Pottru) पोत्रूच्या हिंदी रिमेकमध्ये सुर्या कॅमिओमध्ये दिसणार आहे. सुर्याने (Surya) त्याच्या सीनसाठी शूट केले आहे आणि फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. विक्रम या चित्रपटात सुर्याने खास भूमिका केली आहे. त्यासाठी त्याच्या भरमसाठ फीच्या चर्चा रंगल्या होत्या. सुर्या या चित्रपटाचा निर्माता असून तो या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याने सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. सूर्याने ट्विटमध्ये लिहिले की, टीमसोबत खूप मजा केली. त्याने ट्विटमध्ये सह-निर्माता विक्रम मल्होत्रा यांनाही टॅग केले आहे. अभिनेता सुर्याच्या 2020 चा हिट चित्रपट 'सूरराई पोट्टत्रू'ची हिंदीमध्ये रिमेक बनवला जात आहे. त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती सुर्याने केली आहे. त्यांनी ट्विट करून लोकांना आनंदाची बातमी दिली आहे. या चित्रपटात तो एक छोटी भूमिकाही करत आहे.
Tweet
.@akshaykumar sir to see you as #VIR was nostalgic! @Sudha_Kongara can see our story beautifully coming alive again #Maara! Enjoyed every minute with team #SooraraiPottru Hindi in a brief cameo! @vikramix pic.twitter.com/ZNQNGQO2Fq
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) June 15, 2022
मूळ चित्रपटात, सुर्या एका वायुसेनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती, जो कमी पैशात भारतात एअरलाइन सुरू करण्याचे स्वप्न पाहतो. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार सुर्याच्या भूमिकेत आहे आणि राधिका मदन त्याच्यासोबत लीडमध्ये आहे.