Rosie The Saffron Chapter (PC - Twitter)

Rosie The Saffron Chapter: अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) च्या आगामी चित्रपटातून श्वेता तिवारी (Shweta Tiwari’s) ची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'रोजी: द सॅफरन चॅप्टर' (Rosie The Saffron Chapter) या चित्रपटातून पलक डेब्यू करणार असून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटातील पलकचा लूक यापूर्वीचं समोर आला होता.

दरम्यान, आता निर्मात्याने या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या पोस्टरवर पलक तिवारीसह विवेक ओबेरॉयचीदेखील झळक पाहायला मिळत आहे. विवेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. (हेही वाचा -Kangana Ranaut vs BMC: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये बीएमसीला म्हटलं महाराष्ट्र सरकारचा 'पाळीव प्राणी')

विवेक ओबेरॉय ने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काही गोष्टी आपल्याला वाटतात तशा नसतात. म्हणूनच मागे वळून पाहू नका. (#पलटकरमतदेखना) मला आशा आहे की, तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल.' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पलक अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून विवेकचा लूकही पाहण्यासारखा आहे.

'रोजी: द सॅफरन चॅप्टर' या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहेत. या चित्रपटाचं शुटिंग या वर्षाच्या शेवटी सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एंटरटेनमेंट हाऊस ऑफ मंदिरा एन्टरटेन्मेंट आणि विवेक ओबेरॉय यांनी केली आहे.