Romantic Songs of Bollywood | (Photo Credits: Twitter/ ANI)

Romantic Songs of Bollywood: लांबणीवर पडलेला मान्सून अखेर दाखल झाला. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पाऊस म्हटलं की, मस्त पैकी जोडीदार गरमागरम कांदाभजी किंवा पोहे आणि चाहा यांचा अस्वाद ओघानेच आला. ज्यांना कोणाला पावसात भिजायला जाता येत नाही, अशी जोडपी मग बॉलिवडमध्ये आपला आधार शोधतात. बॉलिवूडच्या काही रोमँटीक गाण्यांमध्ये (Best Bollywood Rain Songs) स्वत:ला हरवून जातात. आजही आम्ही आपणास अशीच काही गाणी इथे देत आहोत. ज्या गाण्यांनी अनेकांच्या मनात पाऊस आणि जोडीदाराच्या आठवणी जागवल्या.

बारिश (Baarish)

'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील हा रोमँटिक ट्रॅक पावसाळ्याच्या दिवसांसाठी सर्वोत्तम आहे. हे अॅश किंग आणि शाशा तिरुपती यांनी गायले होते आणि त्यात अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. हे गीत अराफत मेहमूद आणि तनिष्क बागची यांनी लिहिले होते.

बरसो रे मेघा मेघा (Barso Re Megha Megha)

2007 च्या 'गुरू' चित्रपटातील "बरसो रे" हे गाणे आणि पाऊस तुम्ही चुकवू शकत नाही. श्रेया घोषालचे सूर पावसाचा पुरेपूर आनंद देता. त्यावर ऐश्वर्या राय बच्चनचा डान्स परफॉर्मन्स म्हणजे त्यावर लागलेले चार चांदच जणून. हे गाणे रिलीज होऊन जवळपास 15 वर्षे झाली आहेत, तरीही अनेकजण ते पुन्हा पुन्हा ऐकतात.

टिप टिप बरसा पानी (Tip Tip Barsa Paani)

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या 1994 च्या मोहरा चित्रपटातील हे गाणे तर एक दंतकथा बनले आहे. आनंद बक्षी यांनी गीत लिहिले आहे. तर उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले आहे. गाण्यातील रवीना आणि अक्षयची केमिस्ट्री जबरदस्त आहे. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या अॅक्शन चित्रपटात हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे.

रिमझिम गिरे सावन (Rimjhim Gire Sawan)

'मंझिल' चित्रपटातील सदाबहार पावसाचे गाणे किशोर कुमार यांनी गायले होते आणि अभिनेते अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रीत झाले होते. हे गाणे त्याच्या रिलीजच्या जवळपास 44 वर्षांनंतरही अजूनही प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहे आणि पाऊस पडतो तेव्हा प्ले केले जाते.