Rishi Kapoor यांचा शेवटचा सिनेमा 'शर्माजी नमकीन' चे पोस्टर आऊट; मुलगी रिद्धिमा ने मानले परेश रावल यांचे आभार
Rishi Kapoor (Image Credits: Instagram)

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त अनेकांकडून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जात आहे. ऋषि कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) हिने देखील लहानपणीचा फोटो शेअर करत जुन्या आठवणी जागल्या आहेत. सोशल मीडियावर या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. त्यानंतर आता रिद्धिमाने ऋषि कपूर यांचा शेवटचा सिनेमा  शर्माजी नमकीन चे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने परेश रावल यांचे आभार मानले आहेत.

रिद्धिमाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ऋषि कपूर यांच्या हातात एक लहानशी सूटकेस दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सारख्यात पोशाखात परेश रावल दिसत आहेत. "हा सिनेमा खास असून याचे नाव शर्माजी नमकीन आहे. ज्याचे पोस्टर शेअर करताना मला खूप अभिमान वाटत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात नामांकित अभिनेत्यांपैकी एक त्यांच्या प्रेम, आदर आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून. हा सिनेमा त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी भेट आहे. हा त्यांच्या शेवटच्या सिनेमातील पहिला लूक," असे रिद्धिमाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rishi Kapoor यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त Ranbir Kapoor ने कुटुंबियांसमवेत केली ऑनलाईन पूजा; पहा Photo)

Riddhima Kapoor Post:

यासोबत तिने परेश रावल यांचे देखील आभार मानले आहेत. मागील वर्षी 30 एप्रिल रोजी कॅन्सरमुळे ऋषि कपूर यांचे निधन झाल्याने सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे परेश रावल यांनी त्यांची भूमिका साकारत सिनेमा पूर्ण केला. दरम्यान, ऋषि कपूर यांचा हा शेवटचा सिनेमा असल्याने चाहत्यांसाठी हा  खास ठरणार आहे.