Rishi Kapoor यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त Ranbir Kapoor ने कुटुंबियांसमवेत केली ऑनलाईन पूजा; पहा Photo
Rishi Kapoor, Ranbir Kapoor and Riddhima Kapoor Sahni (Photo Credits: Instagram)

Rishi Kapoor's First Death Anniversary: बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ऋषि कपूर  यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. या निमित्ताने पत्नी नीतू कपूर ((Neetu Kapoor), मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी ऑनलाईन पूजेचे आयोजन केले होते. कोविड-19 (Covid-19) संकटामुळे कुटुंबातील सर्व सदस्य वव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूजेत सहभागी झाले. आज सकाळी रणबीर कपूर गर्लफ्रेंड आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत नीतू कपूरच्या घरी दाखल झाले होता. मीडिया माध्यमांमधून त्यांचे फोटोज समोर आले होते.

शहारातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता पूजेसाठी प्रत्यक्षात उपस्थित न राहता झूम मिटिंगद्वारे पूजेत सहभागी होऊ, असे ऋषि कपूर यांची बहिण रीमा जैन यांनी पिंकविला सोबत बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या की, नीतू ऑनलाईन हवन पूजा करेल. रणबीर कपूरच्या हस्ते ही पूजा पार पडेल. इतर कुटुंबातील सदस्य झुमद्वारे पूजेत सहभागी होतील. (Rishi Kapoor's First Death Anniversary: ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी रिद्धिमा कपूर साहनी ने शेअर केली भावनिक पोस्ट)

पहा फोटो:

ऋषि कपूर यांच्या पुण्यतिथी निमित्त कपूर कुटुंबियांनी केली पूजा (Photo Credits: Instagram)

ऋषि कपूर चे जावई आणि रिद्धिमा कपूर यांचे पती भरत साहनी यांनी ऑनलाईन पूजेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तु्म्ही पाहू शकाल, ऋषि कपूर यांनी कुंकवाचा टिळा लावून हार घालून पूजा केली आहे. समोर दिवा-अगरबत्ती ठेवली आहे. दरम्यान, मागील वर्षी 30 एप्रिल रोजी कॅन्सरमुळे ऋषि कपूर यांचे निधन झाले होते.