Rishi Kapoor's First Death Anniversary: ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी रिद्धिमा कपूर साहनी ने शेअर केली भावनिक पोस्ट
ऋषि कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी (Photo Credits: Instagram)

Rishi Kapoor's First Death Anniversary: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. आज, 2020 मध्ये ऋषी कपूर यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि या जगाला निरोप दिला. ल्यूकेमिया आजाराने ग्रस्त ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत बराच काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर ते भारतात परतले. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर चित्रपट जगताला मोठा धक्का बसला.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक त्यांचे स्मरण करीत आहेत आणि त्यांना आदरपूर्वक आदरांजली वाहात आहेत. आज ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. रिद्धिमाने वडिलांसोबतचा आपला संस्मरणीय फोटो पोस्ट करताना लिहिलं की, "कदाचित एकदा मी तुम्हाला मुश्क म्हणताना ऐकू शकले असते. आपल्या पुढत्या भेटीपर्यंत आम्हाला तुमची कायम आठवण येत राहील. आम्ही आजही तुमच्याबद्दल बोलत आहोत, आम्ही तुम्हाला विसरला नाही आणि कधीचं विसरणारही नाही."

रिद्धिमाने पुढे लिहिलं की, "आम्ही तुम्हाला आमच्या मनाजवळ ठेवतो आणि तुम्ही तिथेचं राहाल जेणेकरुन तुम्ही आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग दाखवाल." (Rishi Kapoor's First Death Anniversary निमित्त नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली भावूक पोस्ट)

दरम्यान, जेव्हा ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचार करत होते, तेव्हा शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांनी अभिनेत्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्या काळात ऋषी कपूरची पत्नी नीतू कपूर त्यांची काळजी घेत होती.