
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चा आज 26 जून रोजी 36 वा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त अर्जुनने पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शुक्रवारी रात्री बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), रणवीर सिंह (Ranveer Singh), विजय देवरकुंडा यांच्यासह अन्य सेलिब्रिटी अर्जुनला भेटण्यासाठी पोहचले. त्याचसोबतच अर्जुनच्या तिन्हीही बहिणी अंशुला (Anshula), खुशी (Khushi) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी देखील भावाला शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्या. मीडियाच्या कॅमेऱ्यात हे सर्व सेलिब्रिटी कैद झाले आहेत. त्यांचे फोटोज समोर आले असून ते वेगाने व्हायरल होत आहेत.
यावेळेस रणबीर-आलिया यांच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले. रणवीर सिंह चा देखील अंदाज पाहण्यासारखा होता. तर जान्हवी कपूर जिन्स आणि ब्लॅक शर्टमध्ये अत्यंत हॉट दिसत होती. (अर्जुन कपूर ने Lady Love मलाइका अरोडा हिचा 'हा' स्पेशल फोटो शेअर करत म्हटले ''Fool'')
पहा फोटोज:





अर्जुन कपूर 'एक विलन 2' आणि 'भूत पोलिस' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, मलायका अरोरा सोबतच्या चर्चांनी अर्जुन कपूर अनेकदा चर्चेत असतो. मलायकासोबत रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी त्याने सलमान खानच्या बहिणीला अर्पिता खान ला डेट केले होते.