Malaika Arora Birthday: अर्जुन कपूर ने Lady Love मलाइका अरोडा हिचा 'हा' स्पेशल फोटो शेअर करत म्हटले ''Fool''
Malaika Arora and Arjun Kapoor (Photo Credits-Twitter)

Malaika Arora Birthday: बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्री मलाइका अरोडा हिचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यामुळे मलाइका हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मलाइका हिचा खास मित्र आणि पार्टनर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने ही स्पेशल अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन याने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर मलाइका हिचा एक अनोखा फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील मलाइका हिचा अंदाज पाहण्यासारखा आहे.(Malaika Arora Hot Photoshoot: मलायका अरोडा च्या ग्लॅमरस फोटोशूटसह तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियात लागली आग See Photos)

या फोटोमध्ये मलाइका हिने पीच रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये दिसून येत आहे. तर फोटो क्लिक करतानाची तिची पोज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. मलाइका हिचा हा कधी न पाहिलेला हा फोटो पाहून ती अतिशय क्यूट दिसून येत आहे. तर अर्जुन कपूर याने मलाइका हा फोटो शेअर करत त्यावर Happy Birthday My Fool असे लिहिले आहे.(Arjun Kapoor Birthday: मलाइका अरोड़ा ने अर्जुन कपूर ला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पहा तिची इंस्टाग्राम पोस्ट!)

मलाइका अरोड़ा (Image Credit: Instagram)

तर मलाइका हिच्या वाढदिवसानिमित्त बेबो म्हणजेच करिना हिने सुद्धा खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. करिना हिने लिहिले आहे की, Happy birthday darling Malla. आपण नेहमीच आपले जेवण आणि गर्ली नाइट्स सुद्धा ट्विनिंग टी-शर्ट्स मध्ये Enoy करुयात.