Malaika Arora Hot Photoshoot: मलायका अरोडा च्या ग्लॅमरस फोटोशूटसह तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियात लावली आग (See Photos)
मलायका अरोरा (Photo Credits-Instagram)

Malaika Arora Hot Photoshoot: बॉलिवूड मधील आपल्या हॉट अदा आणि फिगरमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोडा हिने केलेल्या एका फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये मलायका अत्यंत बोल्ड, सेक्सी अंदाजात दिसून येत असून तिच्या चाहत्यांना सुद्धा तिचा हा लूक फार आवडला आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. तसेच सोशल मीडियातील युजर्ससह तिच्या चाहत्यांनी हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

मलायका हिने आपल्या ग्लॅमरस अंदाजातील फोटोशूटचे फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंची सर्वत्र चर्चा तर सुरु झालीच आहे. पण तिने घातलेला ड्रेस आणि दिलेली पोज पाहून मॉडेल्सला ही तिच्याकडून प्रेरणा मिळेल. इंटरनेटवरील प्रत्येक युजर्सचे लक्ष मलायका हिच्या या फोटोंवर जात आहे.(Disha Patani Hot Look In Yellow Monokini: दिशा पटानी ने शेअर केला पिवळ्या रंगाच्या मोनोकिनीतील फोटो; Watch Photo)

 

View this post on Instagram

 

@monishajaising × @renuoberoiluxuryjewellery × @bootmaker.in × @manekaharisinghani × @divyachablani15 × @flavienheldt Shot by @tejasnerurkarr

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका तिच्या हॉट पर्सनालिटीमुळे तिच्या चाहत्यांसह फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक आहे. तिची स्लिम आणि फिट पर्नसालिटी पाहून ही भल्याभल्यांना तिच्यासारखे दिसावे असे वाटते. बॉलिवूड मध्ये आपल्या डान्स मुळे प्रसिद्ध असणारी मलायका आपल्या चाहत्यांची मन जिंकण्यासाठी कोणतीच गोष्ट सोडत नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका हिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र 14 दिवस होम क्वारंटाइन होत तिने कोरोनावर मात केली होती. तसेच होम क्वारंटाइनमधील काळ कशा पद्धतीचा होता याबद्दलचा तिचा अनुभव सुद्धा तिने इंन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून शेअर केला होता.