Ram Kapoor's Father Anil Kapoor Dies: राम कपूर यांचे वडील अनिल कपूर यांचे कर्करोगामुळे निधन; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट
Ram Kapoor (PC - Wikipedia)

Ram Kapoor's Father Anil Kapoor Dies: अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) यांचे वडील अनिल कपूर (Anil Kapoor) यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी अनिल कपूरने जगाला निरोप दिला. ते कर्करोगाशी झुंज देत होते. वडिलांच्या निधनानंतर राम कपूर यांनी गुरुवारी सोशल मीडियावर अमूलची पोस्ट शेअर केली आहे. राम कपूर यांनी अमूलची पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की, 'अमूलने माझ्या वडिलांना श्रद्धांजली वाहिल्याचं पाहून मी निशब्द झालो. तुम्ही खरोखरचं एक लीजेंड होता पप्पा. तुम्ही नेहमीचं आठवणीत राहाल. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.' द हिंदूच्या एका वृत्तानुसार, राम कपूरच्या वडिलांनी अमूलबरोबर काम करण्यास सुरूवात केली, तेव्हा अमूलची 'अमूल - द टेस्ट ऑफ इंडिया' ही टॅगलाइन देण्यात आली.

राम कपूर यांची पत्नी गौतमी कपूर यांनीही सोशल मीडियावर अनिल कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. गौतमीने लिहिलं आहे की, 'पप्पा तुम्ही नेहमीच आमच्या अंतःकरणात राहाल. तुम्ही सर्वात बलवान व्यक्ती होता.' राम कपूरचे वडील अनिल कपूर हे 'बिली' म्हणून लोकप्रिय होते. (वाचा - Jacqueline Fernandez Hot Photo: जॅकलिन फर्नांडिसने कूपिंग थेरपीनंतर शेअर केला हॉट फोटो; निशान पाहून चाहत्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Kapoor (@gautamikapoor)

दरम्यान, राम कपूर यांचे चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनेत्याच्या पोस्टवर भाष्य करत आहेत. तसेच अभिनेत्याच्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. जेनिफर विंगेट, इरिस भास्कर, रवि के चंद्रन, सुमोना चक्रवर्ती, दृष्टि धामी, किश्वर मर्चेंटसह हजारो चाहत्यांनी अनिल कपूर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.