राखी सावंत कायमची निघाली सासरी; तिच्याऐवजी तिची आई करणार लोकांचे मनोरंजन (Video)
राखी सावंतची आई (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपली वक्त्यव्ये, करामती, अभिनय यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने (Rakhi Sawant) बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओ, अंगप्रदर्शन यांच्या जोरावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. राखी सावंत सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. चाहत्यांनाही तिच्या आयुष्याबद्दल उत्सुकता असल्याने ती नेहमीच आपले अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच राखीने तिचे लग्न झाले असल्याचे सोशल मिडीयावर सांगितले. आता बघता बघता राखी तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली आहे. राखी इंग्लंडला गेल्यावर तिची कमी चाहत्यांनी नेहमीच जाणवेल. मात्र तसे होऊ नये नये म्हणून राखीने चक्क तिच्या आईला मैदानात उतरवले आहे.

 

View this post on Instagram

 

Wooow my mommy is best

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

आपण निघून गेल्यावर आपली आई चाहत्यांचे मनोरंजन करेल असे राखीचे म्हणणे आहे. यासाठी तिच्या आईचे टिक टॉकवर नवीन खातेही सुरु करण्यात आले आहे. राखीने आपल्या आईचे व्हिडिओज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टसह राखीने जाहीर केले की, जेव्हा ती आपल्या पतीसमवेत लंडनला जाईल तेव्हा तिची आई करमणुकीची जबाबदारी स्वीकारेल. (हेही वाचा: राखी सावंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; ठरली ‘Best Item Dancer in Bollywood’)

राखीच्या आईचे हे व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे की, तिच्यात राखी एवढे नाही मात्र काही प्रमाणात तरी लोकांचे मनोरंजन करण्याचे गुण आहेत. राखीने दिलेल्या माहितीनुसार, तिने एनआरआय रितेशशी लग्न केले आहे. हे लग्न गुपचूप मुंबईत झाले. या लग्नाचे काही फोटो समोर आले होते पण कुणालाही राखीच्या नवऱ्याचा चेहरा दिसला नाही.