Rakhi Sawant झाली Wardrobe Malfunction ची शिकार; गाण्याचे शुटींग करताना तुटली ब्लाउजची दोरी, व्यक्त केला संपात (Watch Video)
Rakhi Sawant Wardrobe Malfunction (Photo Credits: Facebook)

याआधी अनेक अभिनेत्री Wardrobe Malfunction च्या शिकार झाल्या आहेत. यामुळे मोठे गदारोळही माजले आहे. आता प्रसिद्ध नर्तिका आणि अभिनेत्री राखी सावंतवर (Rakhi Sawant) असाच प्रसंग ओढवला आहे. नुकतेच राखी सावंतला Wardrobe Malfunction च्या अनुभवातून जावे लागले. राखीने एका व्हिडीओद्वारे या गोष्टीची माहिती दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. होळीनिमित्त गाणे शूट करताना राखी सावंतचा ब्लाउझ फाटला आहे. या व्हिडीओमध्ये राखीला घडल्या प्रकाराबद्दल अतिशय राग आल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये राखी स्वतःचा अनुभव कथन करताना सांगत आहे, ‘अजून एक झटकासुद्धा मारला नाही आणि माझ्या ब्लाउजची दोरी फाटली. पहा कशी दोरी शिवली आहे. मी आता काय सेफ्टी पिनवर काम चालवू काय? मी कसे नाचू? सेफ्टी पिनवर? मी काय करू? मी एक कलाकार आहे, तुम्हाला समजले पाहिजे की जेव्हा आम्ही व्यासपीठावर जातो, तेव्हा आम्हाला योग्य आणि टाईट गोष्टी दिल्या पाहिजेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Tadka (@bollywoodtadka58)

राखी सावंत पुढे म्हणते, ‘लोक म्हणतात की आम्ही कॉन्ट्रोव्हर्सी करतो. अशा गोष्टी करण्यासाठी काय आम्ही स्वतःचा ब्लाउज फाडू काय? कलाकारांच्या बाबतीत नेहमी असे घडते. मी कुठे जाऊ? पहा संपूर्ण युनिट माझी प्रतीक्षा करीत आहे. हा कलाकाराचा संघर्ष आहे.’ (हेही वाचा: Kriti Sanon हिच्या फोटोवर कमेंट करणे महानायक Amitabh Bachchan यांना पडले महागात; नेटकऱ्यांनी केले ट्रोल)

दरम्यान, राखी सावंत एका होळीच्या गाण्याचे शुटींग करत होती. ब्लाउज आणि लेहंगा परिधान करून ती गाणे शूट करत असताना अचानक तिच्या ब्लाउजची दोरी तुटली. शूटिंग दरम्यान ती तुटलेल्या ब्लाउजच्या दोरीवरून संतापली. मात्र सेटवर दोरी शिवणारी व्यक्तीही उपस्थित होती. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की राखी सावंत आपल्या ब्लाउजची दोरी शिवून घेत संताप व्यक्त करत आहे.