Kriti Sanon हिच्या फोटोवर कमेंट करणे महानायक Amitabh Bachchan यांना पडले महागात; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Kriti Sanon And Amitabh Bachchan (Photo Credit: Facebook)

उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये काही काळात छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कृति सेनन (Kriti Sanon) सध्या सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चेत आहे. नुकताच कृति सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. कृति सेननच्या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही कृतिच्या कमेंट केली आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांना त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कृतिने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या फोटोवर अमिताभ बच्चन यांनी वॉव अशी कमेंट केली होती. मात्र, नेटकऱ्यांनी ‘दीदी तेरा दादु दिवाना’ असे म्हणत अमिताभ बच्चन यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्या या ट्रोलिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. हे देखील वाचा- Holi 2021: सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिज यांचा होळीतला भन्नाट डान्स पाहिलात का? व्हिडिओ पाहून होतील आठवणी ताज्या

कृति सेनेनची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

कृति सेननने बॉलिवूडमधील अनेक हीट चित्रपटात काम केले आहे. तसेच ती अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बच्चन पांडे या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात टाइगर श्रॉफ देखील असणार आहे. सध्या ती भेडिया चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचबरोबर ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटातही ती सीताची भूमिका साकारणार आहे.